चेहरा मनाचा आरसा असतो असे म्हणतात. आपल्या चेहर्याला नेहमी कोमल आणि तजेलदार ठेवा. त्यामुळे कोणत्याही मेकअपची गरज तुम्हाला पडणार नाही.
कोरडी त्वचा: अर्धा कप थंड दुधात कोणत्याही वनस्पती तेलाचे थेंब टाका. जैतूनचे तेल, सीसम तेल, किंवा सुरजमुखी तेल घेऊ शकता. एका बाटलीत भरून ठेवा. आणि व्यवस्थित हलवा. चेहर्याची त्वचा साफ करून कापसाने लावा. उरलेले मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा.
तेलकट त्वचेसाठी: गुलाब पाण्यात लिंबाचा रस सारख्याच प्रमाणात मिसळा. पूर्ण चेहर्यावर कापसाच्या मदतीने लावून घ्या. दहा मिनिटानंतर धुवा.
मिक्स त्वचेसाठी: 1/4 चमचा लिंबाचा रस घेऊन त्यात थंड दूध आणि काकडीचा रस टाका. पूर्ण चेहर्यावर लावा आणि काही वेळाने धुऊन घ्या.
सामान्य त्वचा: एक चमचा बेसन पिठात अर्धा चमचा लिंबाचा रस, सीसम तेल, आणि मिल्क पावडर मिसळा आणि हा पॅक बनवून चेहर्यावर लावा. थोड्या वेळाने पाण्याने धुऊन घ्या.
तेलकट त्वचेसाठी दररोज: एक मोठा चमचा बेसन पिठात लिंबाचा रस, एक चमचा तांदळाचे पीठ आणि दोन चमचे दही टाकून मिक्स करा. पंधरा मिनिटे लावलेले राहू द्या. नंतर कोमट पाण्याने हलक्या हाताने धुऊन टाका.