टॅटू काढण्याचे सोपे उपाय

शनिवार, 23 ऑगस्ट 2014 (17:48 IST)
आजकाल सर्व तरुण-तरुणींमध्ये हातावर टॅटू काढण्याचे क्रेझ आहे. काही जण मानेवर, पाठीवर, हातावर तर काही जण पूर्ण शरीरावर काढतात. हे काढण्यासाठी जितके पैसे द्यावे लागते, त्याच्यापेक्षा जास्त पैसे ते मिटवण्यासाठी द्यावे लागतात.

काही जणांना वाटते टॅटू एकदा काढला की तो तसाच कायम राहतो, मात्र आता हा गैरसमजही दूर होऊ शकतो. असेच काही उपाय जे केल्याने तुमचा कायमस्वरूपी टॅटूही जाऊ शकतो.टॅटू काढण्यासाठी स्विच्ड लेझर नामक टिट्रमेंट करावी लागते. त्यामध्ये लेझरच्या साहाय्याने त्वचेवर पसरलेली शाई जाळण्यात येते. मग टॅटू पूर्णपणे काढून टाकण्यासाठी तुम्हाला ६ ते ८ वेळा लेझर टिट्रमेंट घ्यावी लागते. यासाठी साधारणपणे ३00 ते ५00 रुपयांपर्यंत खर्च येतो. 
 
काही काही पार्लरमध्ये टॅटू काढण्यासाठी प्रति स्क्वेअर इंच खर्च येतो. यासाठी २-३ वेळा जावे लागते.
 
सर्जरीद्वारेही टॅटू काढला जातो. मात्र, याचा खर्च या टॅटूवर अवलंबून असतो. साधारणपणे याला १५-२0 हजारही खर्च लागू शकतो.
 
टॅटू काढण्यासाठी कुशल सर्जन व लेझर मशीनची गरज असते, असे मत या क्षेत्रातील स्पेशालिस्टचे आहे. 
 
टॅटू काढण्यासाठी बाजारात वेगवेगळी साधने, क्रिम उपलब्ध असतात. यामुळे टॅटू कधीही जात नसून तुमच्या त्वचेला नुकसान पोहचू शकते. त्यामुळे या क्रिमचा वापर करू नये.

वेबदुनिया वर वाचा