* ब्लॅक, न्यूड अणि न्यूट्रल कलर्स कोणत्याही रंगाच्या पेहरावावर उठून दिसतात. तुम्हाला रंगीत क्लच घ्यायचा असेल तर बेज, बॉटल ग्रीन किंवा केनरी येलो यासारखे रंग निवडा. पार्टी किंवा लग्नाला जाताना थोडं फार नक्षिकाम किंवा खडय़ांनी सजवलेला क्लच खरेदी करायला हरकत नाही.
* स्वस्त क्लचचा दर्जा लगेच लक्षात येतो. त्यामुळे उत्तम दर्जाचा लेदर क्लच निवडा. तुम्ही लेदरमध्ये ब्राऊन कलरचा क्लच निवडू शकता. क्लच निवडताना चेन व्यवस्थित आहे का, ते बघून घ्या. लेदर क्लच नको असेल तर कॉर्क क्लच हा एक चांगला ऑप्शन आहे.
* तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसारच क्लच निवडा. तुम्ही थोडय़ा जाड असाल तर स्लिक ऑप्शन निवडा. चौकोनी, त्रिकोणी आकाराचा क्लच अशा व्यक्तींना शोभून दिसेल. बारीक अंगकाठी असलेल्या महिलांना गोल आकाराचा क्लच छान दिसेल.
* क्लचचा आकार लहान असतो. त्यामुळे जास्त वस्तू भरल्या की तो वजनदार दिसतो. क्लचमध्ये फोन, लिपस्टीक, दोन चाव्या, पैसे आणि क्रेडिट कार्ड एवढं सामान बसायलाच हवं हे लक्षात ठेवा.