SBI SO पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु, कसं करावं अर्ज जाणून घ्या

सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (12:10 IST)
SBI SO Recruitment 2020 : स्टेटबँक ऑफ इंडिया ने स्पेशालिस्ट केडर ऑफिसर्स पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 18 सप्टेंबर 2020 रोजी पासून सुरु झालेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर bank.sbi/careers किंवा sbi.co.in/careers वर अर्ज जमा करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख किंवा अंतिम मुदत 8 ऑक्टोबर 2020 आहे.
 
निवड प्रक्रिया - उमेदवाराची निवड शॉर्टलिस्टिंग करून मुलाखतींद्वारे करण्यात येणार आहे. 
किमान योग्यता आणि अनुभवावरच मुलाखती घेणार नसून उमेदवारांच्या शॉर्टलिस्टिंग साठी बँकेच्या समितीद्वारे निर्णय घेतले जाणार. त्यानुसार उमेदवारांना मुलाखतीस बोलावले जाणार.
 
मुलाखतीसाठी ची पात्रता -मुलाखतीसाठी 100 गुण असणार, मुलाखतीसाठीचे पात्र गुण असल्याचा निर्णय बँक घेणार.
 
 
मेरिट यादी - मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची मेरिट यादी(लिस्ट)तयार करण्यात येईल. जर दोन उमेदवारांचे गुण सारखे असल्यास वयाच्या आधारे यादीत क्रमवारी केली जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती