ग्राम विकास विभागाच्या यादीतील जिल्हा परिषद आरोग्य सेवक ,सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,औषध निर्माता आरोग्य पर्यवेक्षक, या पाच संवर्गासाठी एकूण दहा हजार एकशे सत्तावीस रिक्त पदांची भरती होणार आहे. या पाच संवर्गासाठी एकूण 4 लाख 2 हजार 12 अर्ज प्राप्त झाले आहे.या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार हे अर्ज प्राप्त झाले असून ही भरती प्रक्रिया आता तातडीने सुरु करण्याचे निर्देश मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.
ते म्हणाले ,आरोग्य विभागाशी संबंधित 5 संवर्ग वगळता इतर संवर्गतील पदांच्या बाबत जिल्हा परिषद आणि जिल्हा पंचायत समितीसाठी मंजूर असलेल्या पदांच्या सुधारित आकृतींबन्ध मंजूर करण्यासाठी विभागीय स्तरावर आढावा घेण्यास सांगितले आहे. आणि तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. या सुधारित आकृतिबंध ला मान्यता मिळाल्यावर इतर संवर्गातील पदांची भरती जिल्हा परिषदेमार्फत लवकरच करण्यात येईल.