Post office bharti 2022 10वी आणि 12वी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये 38000 पदांसाठी नोकरीची संधी

मंगळवार, 17 मे 2022 (15:08 IST)
भारतीय टपाल विभागाने 38 हजाराहून अधिक रिक्त जागांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. कृपया लक्षात घ्या की या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना परीक्षेला बसावे लागणार नाही. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.
 
रिक्त जागा तपशील:
इंडिया पोस्टने एकूण 38,926 पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
 
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज प्रक्रिया 2 मे पासून सुरू झाली असून उमेदवार 5 जून 2022 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात.
 
पात्रता:
कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी किमान १८ आणि कमाल ४० वर्षे वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात.
 
निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षेशिवाय गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.उमेदवारांचे दहावीचे गुण विचारात घेतले जातील. अधिसूचनेत उमेदवारांशी संबंधित संपूर्ण तपशील तपासा.
 
वेतनमान -
निवड झालेल्या उमेदवारांना 10 ते 12 हजारांपर्यंत वेतन मिळेल.
 
कामाचे रूप -,
टपाल तिकीट आणि स्टेशनरी विकणे
पोस्ट ऑफिस खात्यात पैसे जमा करणे आणि काढणे 
घरोघरी जाऊन पत्र वाटप करणे 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती