दिल्ली विश्वविद्यालय में गैर-शिक्षण पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली, जाणून घ्या कसे कराल अर्ज

शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (13:04 IST)
जर आपण देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. दिल्ली विश्वविद्यालयात नॉन-टीचिंग पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक आणि  योग्य उमेदवारांना राष्ट्रीय परीक्षण एजेंसी (एनटीए) च्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करता येईल. या वेबसाइटवरून आपल्याला अर्ज पत्र देखील प्राप्त होईल ज्याद्वारे आपण नॉन-टीचिंग पदांवर अर्ज करु शकता. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 मार्च, 2021 आहे.
 
या पदांवर भरतीसाठी शुल्क आकरालं जाईल. रजिस्ट्रेशनसाठी सामान्य वर्गाच्या उमेदवारांना एक हजार रुपए, इतर पिछडा वर्गाच्या लोकांना 800 रुपये आणि इतरांसाठी 600 रुपए शुल्क ठेवण्यात आले आहे. महिलांसाठी देखील 800 रुपए अर्ज शुक्ल निर्धारित केले गेले आहे. हे शुल्क 17 मार्च, 2021 पर्यंत जमा करता येईल. 
 
राष्ट्रीय परीक्षण एजेंसी (एनटीए) अनुसार विश्वविद्यालय किंवा त्याच्या कॉलेजमध्ये अनुबंध, दैनिक मजूरी किंवा इतर पदांसाठी उपयुक्ततेच्या आधारे काम करणा उमेदवारांच्या अंतिम मेरिट यादीत अतिरिक्त क्रेडिट जोडण्यात येतील. 
 
एनटीए प्रमाणे उमेदवारांना त्याच्या कामाच्या आधारावर दरवर्षी कमाल 10 अंकांतून नंबर दिले जातील. अंक देण्यासाठी, 6 महिन्यापेक्षा अधिक सेवा अवधी किंवा 181 दिवस एक वर्षाच्या रुपात मोजले जातील. एनटीएने सांगितले की सेलेक्टर उमेदवारांना 6 महिने किंवा 180 दिवसांपेक्षा कमी सेवेत टाकण्यासाठी कुठलेही क्रेडिट देण्यात येणार नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती