MPPEB एमपी पोलीस कॉन्स्टेबल भरती 8 जानेवारी पासून सुरू, अर्ज करा
सोमवार, 4 जानेवारी 2021 (09:26 IST)
MPPEB MP Police Constable Recruitment 2020 : मध्यप्रदेश प्रोफेशनल एग्जामिनेशन बोर्ड (एमपीपीईबी) पोलीस कॉन्स्टेबलच्या 4000 पदांवर भरती साठी अर्ज 8 जानेवारी पासून peb.mponline.gov.in वर केले जाऊ शकतात. जर उमेदवाराचे प्रोफाइल peb.mponline.gov.in वर बनलेली नाही तर तो peb.mponline.gov.in वर जाऊन आपली प्रोफाइल बनवू शकतो. एमपीपीईबी चे फॉर्म भरण्यापूर्वी प्रोफाइलची नोंदणी करणे आवश्यक आहे.
एमपीपीईबी ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक संदेश दिले आहे - ज्यामध्ये लिहिले आहे- 'मध्यप्रदेश प्रोफेशनल एग्जामिनेशन बोर्ड ने आयोजित गृह विभाग, पोलीस मुख्यालयच्या अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 2020 साठी चे अर्ज फॉर्म 8 जानेवारी 2021 पासून एमपी ऑनलाईन पोर्टल peb.mponline.gov.in वर भरले जाणार.
भरतीशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घ्या-
शैक्षणिक पात्रता -
कॉन्स्टेबल जीडी - सर्वसाधारण, अनुसूचित जाती, ओबीसी - दहावी उत्तीर्ण. एसटी वर्ग - आठवी पास
आरक्षक(रेडिओ) 12 वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रॉनिक, मॅकेनिक, मॅकेनिक रेडिओ, टीव्ही इन्स्ट्रुमेंट,मॅकेनिक कंप्यूटर हार्डवेयर, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम ट्रेड्स या पैकी कोणत्याही एकात आयटीआय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
वयो मर्यादा-
किमान - 18 वर्षे आणि कमाल - 33 वर्षे.
अनारक्षित वर्गाच्या महिलांना, ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 5 वर्ष सूट दिली जाईल.
वयो मर्यादाची मोजणी 1 ऑगस्ट 2020 पासून केली जाईल.
महत्त्वाच्या तारख्या-
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख- 8 जानेवारी 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 14 जानेवारी 2021
ऑनलाइन अर्ज सुधारणेची अंतिम तारीख - 19 जानेवारी 2021
लेखी परीक्षा सुरू होण्याची तारीख - 06 मार्च 2021
निवड प्रक्रिया-
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी परीक्षा (पीईटी) आणि शारीरिक मापन चाचणी (पीएमटी)च्या आधारे केली जाईल.