12वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, भारतीय नौदलात 2500 पदांवर होणार भरती

गुरूवार, 22 एप्रिल 2021 (10:40 IST)
विज्ञान शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय नौदलाने नाविक पदांवर भरती काढली आहे. 2500 पदांवर भरती होणार असून योग्य व इच्छुक उमेदवारांनी joinindiannavy.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करायचा आहे. 
 
पदांची माहिती
एकूण पदांची संख्या - 2500
 
अप्रेंटिससाठी नाविक (Sailor AA) - 500 पदे
सेकंडरी रिक्रूटसाठी नाविक (Sailor SSR) - 2000 पदे
 
पगार
21700 रुपयांपासून ते 69100 रुपये प्रति महिना पर्यंत
 
शैक्षणिक पात्रता
मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण आवश्यक. बारावी गणित, मॅथ्स, भौतिकशास्त्राचा अभ्यास आवश्यक. सोबतच रसायनशास्त्र, जीवशास्त्र किन्वा संगणक विज्ञानामधील कोणत्याही एका विषयाचा अभ्यास केलेला असावा.
 
वयोमर्यादा
भारतीय नौदल भरतीसाठी ते अर्ज करु शकतात ज्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 या दरम्यानचा असेल.
 
या प्रकारे करा अर्ज
भारतीय नौदलाची वेबसाइट joinindiannavy.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करता येईल. 
 
महत्त्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया 26 एप्रिल 2021 पासून सुरू होईल. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2021 आहे. 
 
अर्ज शुल्क
जनरल आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना 215 रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. अन्य सर्व प्रवर्गांसाठी अर्ज नि:शुल्क आहे.
 
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि मेडिकल चाचणीच्या आधारे केली जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती