भारतीय लष्करात नोकरीची नामी संधी; अशी आहे अर्जाची प्रक्रिया

मंगळवार, 15 मार्च 2022 (07:47 IST)
सध्याच्या काळात आपल्या देशात अनेक तरुण बेरोजगार असून छोटी -मोठी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. परंतु वाढत्या स्पर्धेमुळे त्यांना नोकरी मिळणे कठीण होऊन बसते. त्यातच शासकीय सुट्टी खासगी संस्थांमध्ये नोकऱ्यांची आधीच कमतरता आहे. त्यामुळे अनेक तरुण स्पर्धा परीक्षांकडे वळतात. मात्र तेथेहीअपयश येते. परंतु अनेक तरुणांना सैन्य भरती प्रवेश मिळू शकतो. सैन्यात जाऊन देशसेवेचे कार्य देखील चांगल्या प्रकारे घडू शकते.आता अशी संधी तरुणांना मिळू शकते कारण इंडियन आर्मी एसएससी कोर्स अधिसूचनेनुसार भारतीय सैन्याने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) च्या विविध तांत्रिक पदांसाठी भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक उमेदवार joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या सैन्य भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. 6 एप्रिल 2022 आहे.

भारतीय सैन्यात या भरतीमध्ये एकूण 191 पदे आहेत ज्यात 14 पदे पुरुषांसाठी, दोन शहीद कर्मचाऱ्यांच्या पत्नींसाठी आणि 175 पदे शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) पुरुषांसाठी आहेत. तसेचरिक्त जागांचा तपशील असा:सामान्य सेवा संवर्ग: 40 नेव्हल ऑर्डनन्सइंस्पेक्टोरेट कॅडर : 6.प्रेक्षक:
8.पायलट: 15लॉजिस्टिक्स : 18शिक्षण : 17अभियांत्रिकी शाखा : 15इलेक्ट्रिकल शाखा : 30
 
भारतीय सैन्य शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) साठी निवडलेल्या उमेदवारांचा कार्यकाळ 10 वर्षांचा असेल. ते जास्तीत जास्त 4 वर्षांच्या कालावधीसाठी (दोन वेळा) वाढविले जाऊ शकते, परंतु ते उमेदवाराची कामगिरी, फिटनेस आणि आरोग्य यावर अवलंबून असेल.या सैन्य भरतीमध्ये अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अर्जाची पात्रता, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम इत्यादीबद्दल तपशीलवार माहितीसाठी joinindianarmy.nic.in येथे संपूर्ण अधिसूचना तपासू शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती