बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजरच्या पदासाठी पदवीधरांसाठी सुवर्ण संधी, अर्ज करा

सोमवार, 28 मार्च 2022 (15:13 IST)
बँकेत नोकरी चा शोध घेणाऱ्यांसाठी बँक ऑफ बडोदा ने ब्रँच रिसिव्हेबल मॅनेजर रिक्रूटमेंट 2022 ची अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेद्वारे, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा किंवा पंजाब, बिहार, महाराष्ट्र, गोवा यासह देशभरातील विविध राज्यांमध्ये BOB शाखेसाठी मॅनेजर पदासाठीची भरती केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात . ऑनलाइन अर्ज 25 मार्च 2022 पासून सुरू झाले आहेत.
 
बँक ऑफ बडोदा शाखेच्या रिसिव्हेबल मॅनेजर भर्ती 2022 द्वारे एकूण 159 रिक्त पदे भरली जातील. यामध्ये 68 जागा अनारक्षित प्रवर्गासाठी, 23 जागा अनुसूचित जातीसाठी, 11 अनुसूचित जमातीसाठी, 42 इतर मागासवर्गीय आणि 15 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. राज्यानुसार रिक्त जागा तपशील BOB जॉब नोटिफिकेशनमध्ये तपासू शकतात. पात्र उमेदवार 14 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इत्यादी तपशील खाली दिले आहेत.
 
पात्रता -
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय बँका किंवा एनबीएफसी किंवा वित्तीय संस्थांमध्ये 2 वर्षांचा अनुभव आणि संबंधित उद्योगांमध्ये एक वर्षाचा कामाचा अनुभव. 
 
वयोमर्यादा -
 अर्जदारांचे वय किमान 23 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अधिक तपशीलांसाठी. बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in  वर सूचना काळजीपूर्वक वाचा.
 
ऑनलाइन अर्ज कसा करायचा -
 बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in  वर जाऊन  होम पेज वरील करिअर विभागातील 'करंट अपॉर्च्युनिटीज' वर क्लिक करा. येथे Apply Online लिंकवर क्लिक करा. येथे आवश्यक तपशीलांसह कॅप्चा कोड टाकून OTP जनरेट करा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे फी भरा. स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा. आपला अर्ज सबमिट केला जाईल. उमेदवार पुष्टीकरण पृष्ठाची प्रिंटआउट घेऊ शकतात आणि त्यांच्याकडे जतन करून ठेवू शकतात. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती