10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी सूवर्ण संधी, रेल्वेत जागा

शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (21:15 IST)
10 उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाचे आहे. भारतीय रेल्वेने 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी सूवर्ण संधी उपलब्ध केली आहे. रेल्वे कोच फॅक्‍टरी, कपूर्थला येथे ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे.
विविध पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्र‍िया 11 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे. इच्‍छूक आणि पात्र उमेदवार 31 जानेवारीपर्यत अर्ज करू शकतात.कर्पुथला येथील रेल्वे कोच फॅक्‍टरीत एकूण 56 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2022 आहे. विशेष म्हणजे ही भरती विना परीक्षा होणार आहे. मुलाखतीद्वारेच उमेदवाराची निवड करण्यात येईल.
 
विविध पदांसाठी मागवण्यात आले अर्ज…
 
फिटर : 4
वेल्‍डर : 1
मशीनिस्‍ट : 13
पेंटर : 15
कार्पेंटर : 3
मॅकेनिक : 3
इलेक्‍ट्र‍िश‍ियन : 7
इलेक्‍ट्रॉनिक मेकेनिक : 9
AC-Ref मॅकेनिक : 1
 
आवेदन शुल्‍क :
 
> जनरल / OBC उमेदवार : 100 रुपये.
> SC / ST / PH/ महिला उमेदवार : नि:शुल्‍क
 
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आवेदन शुल्क डिमांड ड्राफ्ट, इंडियन पोस्‍टल ऑर्डरच्या माध्यमातून जमा करावा लागेल. उमेदवारांनी डिमांड ड्राफ्ट FA& CAO /RCF/Kapurthala या नावाने तयार करावा.
 
कामाचे ठिकाण :
कपुर्थला
वयोमर्यादा..
किमान : 18 वर्षे.
कमाल : 24 वर्षे.
 
सरकारी नियमांनुसार उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल. SC/ST श्रेणीती उमेदवारांना 05 वर्षे तर OBC श्रेणीसाठी 3 वर्षांची सूट दिली जाईल.
 
शैक्षणिक योग्‍यता:
– उमेदवार कोणत्याही शिक्षण मंडळातून किमान 50 टक्क्यांनी 10 वीची परीक्षा उत्तीर्ण असावा.
-उमेदवाराकडे ITI सर्ट‍िफिकेट आवश्यक
असा करा अर्ज (Railway RCF Apprentice Online Form 2022)
 
उमेदवार थेट रेल्वे कोच फॅक्‍टरी, कपुर्थला (Railway Coach Factory, Kapurthala) च्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. 31 जानेवारी 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 
कशी आहे निवड प्रक्र‍िया :
उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर होणार आहे. यासाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती