करीअर ई-बिझनेसमधलं

अलीकडे इंटरनेच्या प्रचंड वापरामुळे कारकिर्दीच्या दृष्टीने नवनव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. विविध क्षेत्रात इंटरनेटचा वापर सहजतेने केला जातोय. आज ई बिझनेसवर अनेकांचा भर आहे. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांना मागणी वाढतेय. 
 
* ई कॉमर्स वेबसाईट्‍सच्या मदतीने व्यवसाय वाढवला जातोय. फेसबुक, ट्विटरवर अनेक ब्रँड्सची स्वतंत्र पेजेस आहेत. अनेक व्यवसाय, व्यवहार सोशल नेटवर्किंग द्वारे किंवा ऑनलाईन होतात. टेकसेव्ही तरुणांना या क्षेत्रात बरीच मोठी मजल मारता येईल. 
 
* या क्षेत्रातील करीअरसाठी काही कौशल्यं अंगी बाणवणं गरजेचं आहे. मुख्यत्वे तुम्हाला माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची चांगली जाण असायला हवी. वेब डिझायनिंगचा कोर्स केला असेल तर उत्तम. तसंच कल्पकता, नवं शिकण्याची तयारी या गोष्टीही गरजेच्या आहेत. मार्केट रिसर्च, ऑनलाईन जाहिरात, ब्रँडिंग, मिडिया प्लॅनिंग याची माहिती असणंही गरजेचं आहे. 
 
* ई बिझनेसशी संबंधित अनेक अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत. ऑनलाईन कोर्सही करता येतात. 
 
* बारवीनंतर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. यासाठी बारावीत 50 टक्के गुण असायला हवेत. पदवीनंतरही हे अभ्यासक्रम निवडता येतात. पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा कालावधी दोन वर्षांचा असतो. 
 
* वर्षाला अडीच ते तीन लाखांचं पेकेज मिळू शकतं. कंपनी आणि तुमच्या कौशल्यानुसार उत्पन्नात वाढ होत जाते.

वेबदुनिया वर वाचा