IBPS ची बंपर भरती

शुक्रवार, 1 जुलै 2022 (15:32 IST)
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS)अंतर्गत लिपिक पदाच्या 6035 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै  2022 आहे. सरकारी बँकांमधील हजारो रिक्त लिपिक पदे (IBPS लिपिक 2022) भरण्यासाठी IBPS तर्फे अर्ज प्रक्रिया आज 1 जुलैपासून सुरू होणार आहे. सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार आजपासून (1 जुलै) IBPS लिपिकाच्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
 
अधिकृत अधिसूचनेनुसार, IBPS ने वर्तमानपत्रांमध्ये एक छोटी सूचना (Short Notification)प्रकाशित केली आहे. या छोट्या सूचनेनुसार, लिपिक पदांसाठी (क्लर्क)  भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे. यासंबंधीची सविस्तर सूचना उद्या IBPS द्वारे  प्रसिद्ध केली जाईल. अधिसूचना (IBPS लिपिक भरती 2022) प्रसिद्ध होताच अर्जाची लिंक महाभरती वर सक्रिय केली जाईल.
 
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
 
पदाचे नाव – लिपिक
पदसंख्या : 6035 पोस्ट
शैक्षणिक पात्रता – Graduation (Refer PDF)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे
अर्ज शुल्क –
SC/ST/PwBD रु. 175/-
GEN/OBC/EWS रु. 850/-
अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 जुलै 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती