लॉकडाउनमुळे अमेरिकेत सर्वजण घरातच आहेत त्यामुळे ऑलनाइन ऑर्डर वाढल्या आहेत. अनेक दिवसांपासून क्वारंटाइन असल्यामुळे किराणा दुकानेही खाली होत चालली आहेत. त्यामुळे कंपीन खाद्यपदार्थांसह आरोग्याशी निगडीत सामना लोकांपर्यंत पोहचवण्याचा विचार कंपनी करत आहे. त्यामुळे अतिरिक्त स्टाफ वाढवला जातोय. वाढत्या बेरोजगारीला पाहून अमेझॉनने नवीन कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रतितास वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.