कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला 'यम द्वितीया' असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते.
भाऊबीजेच्या दिवशी काय करावे? सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल लावून स्नान करावे. बहिणीने खालील मंत्र बोलून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.
तसेच भावाला गोड जेवण घालून त्याच्या कपाळावर टिळा लावावा. त्यानंतर भावाने बहिणीच्या पाया पडून तिला भेटवस्तू द्यावी. या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण केले पाहिजे. भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. बहिणीला भेटवस्तू देवून तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. नंतर तिच्या पाया पडून आशिर्वाद घ्यावा.
या दिवशी यमपूजा केली जाते. यम पूजा करण्यासाठी मंत्र