एक असे गाव जिथे पुरूष करतात तीन लग्न

महाराष्ट्राच्या मुंबईहून 150 किमी दूर देंगंमल गाव असे आहे ज्याची जनसंख्या मात्र 500 आहे. येथील लोकं एक अशी प्रथा पाळतात ज्याबद्दल कमी लोकांच माहीत असेल.
 
पहिली पत्नीचा मृत्यू किंवा घटस्फोट यामागील कारण मुळीच नसलं तरी या गावातील लोकं एकाहून अधिक विवाह करतात ज्यामागे एक उद्देश आहे. आता आपण विचार करत असाल की अशी कोणती बंधने आहे ज्यामुळे येथील पुरूष एकाहून अधिक लग्न करतात. 
असे केलं जातं केवळ पाण्यासाठी. येथे लग्नाचा मुख्य उद्देश्यच हा आहे की प्रत्येक घराला पुरेसं पाणी मिळावं. उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडतात, ढोर मरू लागतात ज्यामुळे समस्या उद्भवते. हे गाव इतर गावांपासून वेगळे पडलेले आहे आणि पाण्याच्या इतर स्रोतांपासून जुळलेलेही नाही.
 
येथील लोकांना पाणी आणण्यासाठी दूर जावं लागतं. 15 लीटर पाणी आणण्यासाठी पायी पायी जाऊन येयला सुमारे 12 तास लागतात. अशात घरातील इतर काम खोळंबतात. म्हणून संतुलन बनवून ठेवण्यासाठी येथील पुरूष एकहून अधिक लग्न करतात.
 
घरात जितके लोकं असतील तेवढं अधिक पाणी घरात आणता येईल. आणि बाकी बायका पाणी भरायला गेल्या तर एखादी पत्नी घरात राहून घर सांभाळू शकते. म्हणून ही प्रथा पडली असावी.

वेबदुनिया वर वाचा