हे आई वसुंधरे, सौंदर्य वर्णू तरी तुझं कित्ती!,
प्रचंड सूंदर तुझा प्रत्येक भु भाग, सांगु तरी किती!
अंगाखांद्यावर पर्वतराजी अन नद्या कितीतरी,
भूगर्भातील संपत्ती तर किती अनमोल खरी,
जंगल, झाड झुडपं, वैभव तुझंच आहे,
नाना औषधी वनस्पतींची खाण येथे आहे.
माणसाने निवारा तुझ्या च कुशीत शोधला,
प्रत्येक जीव तूच माते, ममतेने जगवला,
शतकानुशतक तूच वाहते ग ओझे सर्वांचे,
तुझ्या या उपकरातून आम्हास मुक्त न व्हायचे!