घंटी वाजवून जेवण मागतात ह्या मांजरी ... (व्हिडिओ)

शुक्रवार, 7 एप्रिल 2017 (22:56 IST)
बाहेरच्या जगावेगळे एक जग अजून आहे आणि हे जग सोशल मीडियाच्या नावाने ओळखले जाते. लहान वृत्तापासून मोठ्या मोठ्या वृत्तांबद्दल सर्वात आधी  सोशल मीडियावर लोक आपली गोष्ट शेअर करतात. येथे केव्हा, काय वायरल होईल याचे नेम नाही.  
 
कधी कोणाचा डांसचा व्हिडिओ तर कोणाचा फनी व्हिडिओ वायरल होऊन जातो. या दोन्ही मांजरींचा एक व्हिडिओ पण लोकांच्या मनात बसला आहे. सर्वात आधी ट्विटरवर @b_ru_ruने हा व्हिडिओ पोस्ट केला. नंतर याला @dorseyshaw ने रीपोस्ट केला. या व्हिडिओत जवळ जवळ बसलेल्या 2 मांजरी जेवण करत आहे.  
 
दोघी मांजरींजवळ 2 घंट्या ठेवल्या आहे. त्यांचे जेवण संपल्यावर त्या मांजरी आपल्या जवळ ठेवलेल्या घंटीला वाजवतात आणि व्हिडिओ बनवणारा व्यक्ती त्यांच्या प्लेटमध्ये जेवण ठेवतो. या व्हिडिओला ट्विट केल्यानंतर किमान 1 लाख 60 हजार वेळा ट्विट केले गेले आहे. लोकांना हे व्हिडिओ फार पसंत पडत आहे. तुम्ही पण बघा हा
व्हिडिओ ...  
 
फोटो और व्हिडिओ सौजन्य : यूट्यूब   

वेबदुनिया वर वाचा