जगातील सर्वात जास्त उंचीवर असलेले ट्री-हाऊस

शुक्रवार, 18 मे 2018 (11:48 IST)
जगातील सर्वात जास्त उंचीवर असलेले ट्री हाऊस अमेरिकेतील टेनेसी राज्यातील क्रॉसविल शहरामध्ये आहे. सहा मोठ्या वृक्षांच्या सहायाने हे ट्री हाऊस बनविले गेले आहे. शंभर फुटांच्या उंचीवर असणारे हे ट्री हाऊस दहा मजली इमारतीच्या उंचीइतके उंचावर आहे. हे ट्री हाऊस एखाद्या सामान्य मनुष्याच्या मालकीचे घर नसून टेनेसीचे रहिवासी असणार्‍या एका मंत्री महोदयांचे आहे. ह्या ट्री हाऊसचे निर्माण करणार्‍या आर्किटेक्टला हे ट्री हाऊस बनविण्याची त्याची कल्पना सत्यात उतरविण्याकरिता अकरा वर्षांचा कालावधी उलटून गेला होता. ह्या घराचा विस्तार दहा हजार चौरस फूट इतका प्रचंड आहे. ह्यामध्ये वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी 'स्पायरल', म्हणजेच गोलाकार जिने आहेत. ह्या घराच्या प्रत्येक मजल्याला प्रशस्त बाल्कनीज असून ह्या घरामध्ये एक लहान आकाराचे बास्केट बॉल कोर्टही आहे. ह्या घरामध्ये असलेले पेंट हाऊस ह्या घराची खासियत म्हणता येईल. ह्या घराच्या सजावटीकरिता जुन्या काचेच्या बाटल्यांचा वापर केला गेला आहे. ह्या घराच्या प्रत्येक मजल्याची उंची नऊ ते अकरा फूट आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती