तरूणाईच्या हौशीचे रूपांतर होते व्यसनात

शुक्रवार, 27 डिसेंबर 2019 (12:33 IST)
शहरात धू्म्रपान आणि तंबाखू खाणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आजच्या तरूण पिढीला व्यसन करणे ही खूप साधी सहज गोष्ट वाटत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आपल्या आजूबाजूचच्या उच्चभ्रू लोकांमध्ये राहावयाचे असेल तर त्यांच्या स्टेट्‌सप्रमाणे वागायला पाहिजे, असे त्यांना वाटते. ताण पडला की सिगारेट आणि जास्त दुःख झाले की मद्य अशी स्टाईल झाली आहे. व्यसन करणार्‍या तरूणांची संख्या गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. त्यात शहरातील मुलींची संख्यादेखील कमी नाही. मुलीदेखील व्यसनांच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेलेल्या आहेत. त्यात सिगारेट, हुक्का, भांग, तंबाखू, गुटखा, पान, व्हाईटनर, पेट्रोल, गांजा, मिश्री, तपकिर, चरस, सोल्युशन, ड्रग्ज, निकोटिन, इ-सिगरेट यांसारखे शरीरास हानिकारक असलेली व्यसने महाविद्यालयीन तरूणांईकडून सर्रास केली जात आहेत. बांधकाम करणारर्‍या महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनीदेखील वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेलेल्या आहेत. कधी कधी नशा करण्यासाठी पैसे नसल्यास प्रसंगी चुकीचे पाऊल उचलण्यातही धजावत नसल्याने अप्रत्क्षपणे गुन्हेगारीच्या सापळ्यातही युवक-युवती अडकत आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांचे सिगारेट, गुटखा यांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे आरोगच्या समस्या निर्माण होत आहेत. 
आरोग्यावर होतो गंभीर परिणाम 
तरूणांमध्ये गांजा, निकोटिन व मद्य सेवनाचे प्रमाण जास्त वाढले आहे. तसेच शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे नशा करताना निदर्शनात आले आहेत. त्यात मुख्तः व्हाईटनर, पेट्रोल, सोल्युश यांसारख्या हानिकारक द्रव्याचा वास ओढून नशा केली जात आहे. कॉलेज रोडवरील काही कॅफेमध्ये युवती सर्रास सिगारेट, हुक्का ओढताना दिसतात. कुणी तणावामुळे तर कुणी मौजमजेच्या नावाखाली व्यसनांच्या विळखत अडकत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती