अंडरगारमेंट्समध्ये चमचा लपवण्याची सल्ला, काय कारण असावं

महिलांविरुद्ध होणार्‍या गुन्हाच्या प्रकरणांमध्ये सतत वाढ होत आहे. भारतच नव्हे तर दुनियेतील इतर देशांच्या महिलादेखील असुरक्षित आहे. महिला रॅप, हत्या, बळजबरी लग्न लावणे आणि मानव तस्करी सारखे गुन्हाच्या बळी जात आहे. यापासून बचावासाठी उपाय दिले जात असताना स्वीडनच्या एका संस्थेने एक विचित्र सल्ला दिला आहे. त्यांच्याप्रमाणे महिलांनी अंडरगारमेंटमध्ये चमचा लपवून ठेवायला हवा. या सल्ल्यामागील कारण जाणून आश्चर्य वाटेल.
 
या सल्ल्यामागे देशातून बळजबरीने बाहेर घेऊन जात असलेल्या महिलांना वाचवणे आहे. स्वीडनमध्ये असे अनेक प्रकरण समोर आले आहे ज्यात मुलींचे बळजबरी लग्न करवून त्यांना देशाबाहेर पाठवलं जातं. अशात त्यांना अंडरगारमेंट्समध्ये चमचा ठेवण्याचा सल्ला दिला गेला आहे ज्याने त्या एअरपोर्टवर पकडल्या जातील आणि वेगळ्या खोलीत जाऊन त्यांची चौकशी करण्यात येईल. अशात त्या एअरपोर्ट अधिकार्‍यांना आपली समस्या सांगू शकतात. संस्थेप्रमाणे याबद्दल एअरपोर्ट अधिकार्‍यांनीही सूचित करण्यात आले आहे. अशात मुलींना सुरक्षित वाचवता येईल. हा उपाय बनावटी नाही कारण ब्रिटनमध्ये या प्रकारे अनेक मुलींना वाचवले गेले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती