उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्त केल्याशिवाय थांबु नका.
कुणाची निंदा करु नका. जर तुम्हाला मदतीचा हात पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा, नाहीतर हात जोडा. आपल्या भावांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या.
एक कल्पना घ्या. त्या कल्पनेला आपल्या जीवनाचा भाग बनवा. त्यावर विचार करा, त्याचे स्वप्न बघा. मेंदु, मांसपेशी, नसा आणि शरीराच्या प्रत्येक भागात ती कलपना सामावून घ्या. बाकीच्या विचारांना बाजुला ठेवा. हीच यशस्वी होण्याची पध्दत आहे.