स्वामी विवेकानंदांचे युवकांसाठी संदेश
* सशक्त, उत्साही, श्रध्दावान व निष्कपट असे युवक हवे आहेत.
* तरुणांनो उठा, जागे व्हा व ध्येयप्राप्त केल्याविना थांबू नका.
* धीट व्हा भिऊ नका, निर्भय व्हा.
* युवकांनो, तुम्ही सिंहस्वरूप असूनही स्वत:ला मेषतुल्य का समजता?
* प्रत्येक मनुष्य मूळचाच अनंत शक्तीसंपन्न असतो.
* सामथ्य हेच जीवन आणि दुर्बलता हाच मृत्यू होय.
* बल हेच चिरंतन व शाश्वत जीवन आहे.
* ऐहिक व आध्यात्मिक क्षेत्रात भय हेच अध:पतनाचे कारण आहे. म्हणूनच निर्भय व्हा समर्थ व्हा.
* स्वत:वर श्रध्दा ठेवा, श्रध्देमध्ये अद्भुत सामर्थ्य आहे.
* स्वत:ला दुर्बल मुळीच समजू नका, तुम्ही जसा विचार कराल तसेच बनाल.
* दुर्बलता म्हणजे निष्प्राणता, निर्जीवता.
* विश्वास किंवा श्रध्दा हा धर्माचा पाया आहे.
* युवकांनो, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, राष्ट्राला युवाचेतनेची आवश्यकता आहे.
* हे वीर युवकांनो उठा, स्वत:चे भवितव्य ठरविण्याचा हाच क्षण आहे.
* जोवर तुम्ही थकलेले नाहीत तोवर निश्चय करा.
* श्रेष्ठ आदर्श डोळ्यासमोर ठेवा, आदर्शासाठी सर्वस्व समर्पण करा.
* मनाचे पावित्र्य आणि निष्कपटपणा कायम ठेवा.
* कोणत्याही योजना उत्कट भावनेने वा उदात्त विचारांनी साकार होत नाहीत.
* बळकट हातांची एकत्र गुंफण म्हणजेच संघटन.
* संघटनेशिवाय कोणतेही श्रेष्ठ व चिरस्थायी कार्य होत नाही.