जास्त फोटो पोस्ट करणे असू शकते नैराश्याचे लक्षण

जगभरात सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या माध्यमाचा वापर करताना संदेश आणि फोटो पोस्ट करण्यावर भर दिला जातो पण प्रमाणापेक्षा जास्त फोटो पोस्ट करणे, ही काही सामान्य बाब नाही, बरं का. कारण, अशी सवय म्हणजे नैराश्याचे संकेत असू शकतात, असे एका नव्या संशोधनाता आढळून आले आहे. नैराश्याने त्रस्त असलेल्या फोटोंमध्ये जास्त करुन चेहर्‍यांनाच प्राधान्य दिल्याचे आढळून आले. मात्र, यासाठी फिल्टरचा वापर केला जात नाही, असेही स्पष्ट झाले. 
 
हार्वर्ड आणि वॅरमॉट युनिर्व्हर्सिटीतील एका संशोधकांने सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून निराश व्यक्तींना शोधण्यासाठी एक कॉम्प्युटर प्रोग्रॅम तयार केला. या प्रोग्रॅममध्ये एल्गोरिदम-ट्रिगर अॅलर्ट आहे. ही प्रणाली मानसिक आजाराच्या धोक्याबद्दल अधिक माहिती देते. ईपीजे डाटा सायन्स जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार एल्गोरिदम-ट्रिगर अॅलर्ट प्रणालीने सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टच्या मदतीने 70 टक्के नैराश्यग्रस्तांना शोधून काढले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती