चीज, पनीर खाल्ल्याने घटला कवटीचा आकार

न्यूयॉर्क- मानव जातीने चीज, पनीर व अन्य दुग्धजन्य पदार्थ खाण्यास सुरूवात केली आणि त्यांचा कवटीचा तसेच जबड्याचा आकार छोटा व कमजोर होत गेला, असे संशोधकांनी म्हटले आहे. या खाद्यपदार्थांमुळे आदिम मानवाला खाण्याचा अधिक पौष्टिक आणि सहज उपलब्ध होणारा पर्याय मिळाला त्यामुळे शिकारीवरील त्यांची निर्भरता कमी होऊ लागली.
 
मुलायम पदार्थ खाण्याची सवय लागल्यामुळे जबड्यावरील दबावही कमी झाला. शिकार बंद झाल्याने हात-पायही छोटे होत गेले. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सुमारे एक हजार मानवी कवटींवर संशोधन केले. या कवटी संपूर्ण जगाच्या विविध भागातून गोळा करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माणसाने शेतीवाडी करण्यास आणि दुग्धोत्पादनावर अवलंबून राहण्यास सुरूवात केल्यानंतरच्या काळातील माणसाच्या कवीटींचाही समावेश होता. या काळाच्या आधीच्या कवटींच्या तुलनेत नंतरच्या माणसाच्या कवटी तसेच जबड्यात तफावत आढळून आली.
 
मा़णूस फळे, भाज्या, दुग्धपदार्थ आणि धान्यावर अधिक अवलंबून राहू लागल्याने जंगलात शिकार करुन पोट भरण्याची गरज उरली नाही.

वेबदुनिया वर वाचा