सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी

कित्ती तरी सोसले तिनं आघात,
आयुष्य नव्हे, झेलला झंझावात
दुःखा चे डोंगर सर केले हसत हसत,
आई होऊन शेकडोंची,सेवाव्रत अविरत,
परखड वाणी शस्त्र म्हणून वापरले,
पण उगाचच कुणा बोलून न कधी दुखावले,
निरक्षर तरी कसं म्हणावं, आई गे तुला?
साक्षर होण्यास गिरविती धडे तुझे ठाऊक आहे मला!
मोठमोठ्या सभा गाजवल्या, खणखणीत वाणीने,
अजरामर झाले तुझं नाव,तुझ्याच कर्तृत्ववाने!
विसरून कसं चालेल बरं या आभाळमायेला,
माणुसकी चे दुसरं नाव, हीच ओळख तिला!!
....सिंधुताई ....विनम्र अभिवादन!!..अन श्रद्धांजली!
...अश्विनी थत्ते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती