व्यक्ति‍‍विशेष : राजीव गांधी

मंगळवार, 21 मे 2019 (14:21 IST)
राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई येथे झाला. हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधींचे ते ज्येष्ठ पुत्र होते. इंदिरा गांधींच्या निधनानंतर राजीव गांधींनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाईन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असताना त्यांची ओळख सोनियांशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. 
 
अखेर 1980 मध्ये भाऊ संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. राजीव गांधींच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पाहायला मिळाला. संगणक युगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. 1988 मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टे सोबत संघर्षात झाली. 1991 च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी 21 मे रोजी लिट्टेकडून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी सोनिया गांधी व मुलगा राहुल व मुलगी प्रियंका राजकारणात आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती