लावीयले श्रीहरी ने ओठी ज्यास,
राधे च्या जीवास लागलासे ध्यास,
वेणू रूपाने धन्य झाला जीव खास,
बांबू म्हणून मग ओळखे कोण त्यास!
कित्ती कामास येई , सांगणे न लगे,
औषधीं पासून सर्व करणात तो लागे,
तरंगून नेई तो पैलतीरी अलगद कसा,
शेवटा चा प्रवास ही त्याच्या सोबतीनं जसा,
किती संसार ऊभे ज्यामुळे झाले,
मातीशी या सदा एकरूप होऊन राहिले,
गुढी उभाराया सरसावुनी येई तोच पुढे,