या अवयवाला अंत्रधर असे नाव देण्यात आले असून, ते शरीरातील उदरपोकळीच्या मागच्या आतड्यांना जोडणारी घडी आहे. शिवाय, संशोधकांना शरीरात अखंड आणि पूर्णपणे वेगळ्या प्रकारची संरचना आढळून आली, असाही उल्लेख या पत्रिकेत करण्यात आला आहे. हे अवयव यापूर्वी शरीरात आढळून आले नाही आणि शरीरात नेमके याचे काय कार्य चालते, हे अद्याप माहीत नाही, असे कॉफी यांनी सांगितले. अंत्रधराचे कार्य काय आहे? याचा अजून शोध चालू आहे.