नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी ...
आणि नाते टिकवावयाचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी ...
"एखादे संकट आले की, समजायचे त्या संकटाबरोबर संधी पण आली.
कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही.
संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे".
"वडाचे झाड कधीच पडत नाही, कारण ते जेवढे वर वाढते तेवढेच ते जमिनीखाली
वाढवा".
आयुष्यात सुई बनून रहा. कैची बनून राहू नका.
कारण सुई दोन तुकड्यांना जोडते, आणि कैची एकाचे दोन तुकडे करते.