एकदा दोन मित्र वाळवंटातुन प्रवास करत असतात. प्रवास करत असताना एकदा त्यांच्यात काही कारणावरुन विवाद होतो. यामध्ये एक मित्र दुसऱ्याच्या थोबाडीत मारतो. मार खाल्लेला मित्र दुःखी होतो पण काहीही न बोलता तो वाळुमध्ये लिहितो, "आज माझ्या जिवलग मित्राने मला थोबाडीत मारले."
प्रवास करत करत ते पुढे जातच राहतात. त्यांना समुद्र लागतो. समुद्र बघुन ते त्यात स्नान करायचे ठरवतात. पण मार खाल्लेला मित्र पाण्याच्या भोवऱ्यात अडकतो आणि बुडायला लागतो पण त्याचा मित्र त्याला वाचवतो. या प्रसंगातुन सावरल्यावर काही दिवसांनी तो दगडावर काही अक्षरे कोरतो. "आज माझ्या जिवलग मित्राने माझे आयुष्य वाचवले."