मोदींच्या चाहत्याकडे 2 लाख फोटो

भारताचे पंतप्रधान मोदी यांनी 17 सप्टेंबरला त्यांचा 67 वा वाढदिवस साजरा केला असून भारताच्या पंतप्रधानपदाची धुरा स्वीकारून तीन वर्षे होताहेत तोपर्यंतच जगभरात मोदींच्या चाहत्यांची संख्या कोट्यवधींवर पोहोचली आहे. जयपूरचे मनमोहन अग्रवाल मोदींचे चाहते असून त्यांनी मोदींचे 2 लाख फोटो जमविले आहेत. त्याचे प्रदर्शन त्याने नुकतेच मांडले होते. मोदींचे आणखी फोटो जमवून जागतिक रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न मनमोहन करत आहेत. त्यांना या रेकॉर्डची नोंद गिनीज बुकमध्ये करायची आहे.
 
भारतातही मोदींचे चाहते अनेक आहेत. बागपत येथील 25 वर्षीय नितीन याने स्वत:च्या रक्ताने मोदींचे पेंटिंग तयार केले आहे तर हरियाणातील जगाश्वरी रॅलीत मोदींच्या एका चाहत्याने डोक्याच्या मागचे केस मोदी हे नावं दिसेल या पद्धतीने कापून घेतले होते. मोदींच्या स्किल इंडिया मिशनचा प्रभाव पडलेल्या मेरठमधील एका अभियांत्रिकी विद्यार्थ्यांने इलेक्ट्रिक बाईक तयार केली असनू तिचा वेग आहे 150 ताशी किलोमीटर. वकार अहमद असे या विद्यार्थ्यांचे नाव असून त्याने या बाईकचे नामकरण मोदी बाईक असे केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती