ही दडपशाही कधी थांबणार आहे? जनतेवरचे हल्ले कधी बंद होणार आहे? या हल्ल्यांच्या विरोधात तथाकथिक सेक्युलर, मानवतावादी आवाज का उठलत नाहीत? राज ठाकरे मागे एका भाषणात म्हणाले होते की माझ्यावर टिका करणार्यांना घरात घुसून मारा... यापेक्षा मोठे दुःख कोणते असू शकते. ज्या नेत्याचा झेंडा आमच्या पिढीने एकेकाळी उचलला होता, तो नेता इतका घसरला... ही भावना या अशा नेत्यांच्या मनात कशी निर्माण होते. पॉवरचा वापर जनतेच्या सुरक्षेसाठी न करता, जनतेला मारण्यासाठी का केला जातो? ही कोणती संस्कृती आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली ही शायलॉक संस्कृती तर नाही ना? लोकांची पिळवणूक करणार्या संस्कृतीला स्वामी विवेकानंद शायलॉक संस्कृती म्हणायचे. शायलॉक हा शेक्सपियरच्या नाटकातला व्हिलन आहे. सध्या पॉवरचा वापर करुन सामान्य जनतेची, आवाज उठवणार्यांची जी पिळवणूक होत आहे ती लोकशाहीला लाजवणारी आहे, बाबासाहेबांच्या संविधानाची हत्या करणारी आहे. हे थांबलं पाहिजे, त्यासाठी सज्जनांचा धाक निर्माण झाला पाहिजे. लोकशाही मार्गाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संवैधानिक मार्गाने हा धाक निर्माण करता येईल. ही लढाई स्वतःला अहिंसक म्हणवून घेणार्या क्रूर संस्कृतीच्या विरोधात आहे. ही लढाई शायलॉक संस्कृतीच्या विरोधातली आहे आणि ही लढाई बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने जिंकता येणार आहे. आपण संविधानाची एक प्रत हातात घेऊन "निषेध" असं एकसुरात म्हणालो तरी या शायलॉक संस्कृतीला हादरे बसू शकतात. पण (सध्या लॉकडाऊनचे नियम पाळून) एकसुरात म्हणण्याची गरज आहे... गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचे जे वर्णन केले होते त्या वर्णनाला धक्का पोहोचू न देण्याची जबाबदारी आपल्या हातात आहे. अर्णब गोस्वामी ह्यांच्यावर झालेल्या क्रूर हल्ल्याचा "निषेध"...