हे आहे भारताचे Top 5 ‘चोर बाजार’, येथे मिळत मोबाईल पासून गाडीपर्यंत सर्वकाही
Know About India’s Top 5 Chor Bazaar : आज आम्ही तुम्हाला देशातील असे 5 मोठ्या बाजारांबद्दल सांगत आहोत, जेथे चोरीचे सामान विकले जातात. येथे चोरीचे जोडे, फोन, मोबाइल, गैजेट्स, ऑटो पार्ट्सपासून कार पर्यंत विकली जाते. देशातील या चोर बाजारात चोरीच्या गाड्यांना मॉडिफाई करून विकण्यात येतात. येथे तुम्ही तुमची गाडी किंवा बाइक उभे करणे फारच धोक्याचे असतात. चुकूनही तुम्ही येथे तुमची गाडी पार्क केली तर होऊ शकत त्याचे स्पेयर पार्ट्स चोर बाजाराच्या दुकानांवर दिसून येतील. तर जाणून घ्या देशातील ह्या चोर बाजारांबद्दल …..
मुंबई चोर बाजार (Mumbai Chor Bazaar) :-
मुंबईचा चोर बाजार दक्षिणी मुंबईच्या मटण स्ट्रीट मोहम्मद अली रोडाजवळ आहे. हे मार्केट किमान 150 वर्ष जुने आहे. हे बाजार आधी ‘शोर बाजार’च्या नावाने सुरू झाले होते कारण येथे दुकानदार जोर जोराने आवाज लावून सामान विकत होते. पण इंग्रज लोकांनी ‘शोर’ला चुकीच्या पद्धतीने बोलल्यामुळे याचे नाव ‘चोर’ बाजार पडले.
येथे आहे सेकंड हेड कपडे, ऑटोमोबिल पार्ट्स आणि चोरी केलेल्या घड्याळी व ब्राँडेड घड्याळ्यांची रेप्लिका, चोरीचे विंटेज आणि एंटीक सजावटी सामान मिळतात. या मार्केटसाठी एक अशी म्हण आहे की येथे तुमच्या घरातून चोरी झालेले सामान देखील मिळू शकतात. मुंबई गेल्यावर ‘चोर बाजार’ जरूर फिरा.
काय आहे फ़ेमस
येथील रेस्त्रा आणि कबाब फार फेमस आहे. येथे पाकिटमारांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
बाजार केव्हा उघडतो ?
हे मार्केट रोज सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी 7.30 सुरू असत.
येथील किस्से ही फेमस आहे
या मार्केटबद्दल असे म्हटले जाते की मुंबई यात्रे दरम्यान क्वीन विक्टोरिया यांचे सामान शिपमध्ये लोड करताना चोरी झाले होते. हेच सामान नंतर मुंबईच्या चोर बाजारात मिळाले.
दिल्लीचा चोर बाजार (Chor Bazaar, Delhi) :-
हा देशातील सर्वात जुना चोर बाजार आहे. आधी संडे मार्केटच्या स्वरूपात लाल किल्ल्याच्या मागे लागत होता. आता हा दरियागंजमध्ये नावेल्टी आणि जामा मस्जिदजवळ लागतो. हा बाजार मुंबईच्या बाजारापासून वेगळा आहे. याला कबाडी बाजार देखील म्हटले जाते. येथे हार्डवेयरपासून किचन इलेक्ट्रॉनिकाचे सामान मिळतात.
केव्हा लागतात हे मार्केट
हे मार्केट जामा मस्जिदजवळ रविवारी लागतात. येथे खरेदी करताना प्रॉडक्टची चाचणी करून घेणे फारच गरजेचे आहे कारण जसे वेंडर म्हणतात, तसे प्रोडक्ट निघत नाही.
येथील किस्सा देखील फेमस आहे
ह्या मार्केटबद्दल एक स्टोरी फेमस आहे की एका माणसाने येथे गाडी पार्क केली होती. त्याला आपल्या गाडीचे टायर दुकानात बारगेन करताना मिळाले.
सोती गंज, मेरठ, यूपी (Soti Ganj, Meerut):-
यूपीच्या मेरठमध्ये सोती गंज मार्केट बराच फेमस आहे. या मार्केटला चोरीच्या गाड्या आणि स्पेयर पार्ट्सचे गढ मानले जाते. येथे सर्व गाड्यांचे ऑटो पार्ट्स मिळतात. येथे चोरी, जुने आणि अॅक्सिडेंटमध्ये खराब गाड्या येतात. मेरठचा सोतीगंज मार्केट आशियाचा सर्वात मोठा स्क्रैप मार्केटपण आहे.
केव्हा उघडतो हा मार्केट
हा मार्केट मेरठ सिटीत सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडा राहतो. येथे सामान खरेदी करण्यासाठी तुम्हाला योग्य डीलर मिळणे गरजेचे आहे.
दिल्ली आणि मुंबईच्या चोर बाजाराच्या तुलनेत बेंगलुरु कमी फेमस आहे. हा मार्केट बेंगलुरुमध्ये चिकपेटे जागेवर संडेच्या दिवशी लागतो. येथे सेकेंड हँड गुड्स, ग्रामोफोन, चोरीचे गॅझेट्स, कॅमेरा, एंटीक, इलेक्ट्रॉनिक आयटम आणि स्वस्त जिम इक्विपमेंट मिळतात. हे मार्केट लोकल मार्केट प्रमाणेच आहे.
केव्हा लागतो हा मार्केट
हे मार्केट एक गांवाच्या मार्केटप्रमाणे रविवारी लागतो.
कुठे लागतो हा मार्केट
हे मार्केट बीवीके अय्यंगार रोडावर एवेन्यू रोडजवळ लागतो.
पुदुपेत्ताई, चेन्नई (Pudhupettai, Chennai) :-
सेंट्रल चेन्नईमध्ये स्थित ‘ऑटो नगर’मध्ये जुने आणि चोरीच्या गाड्यांना मॉडिफाई केले जाते. येथे हजारांच्या संख्येत दुकानी आहेत. हे दुकान गाड्यांच्या ओरिजनल पार्ट्स आणि कारला बदलण्यासाठी फेमस आहे. येथे या कामासाठी इंटरनॅशनल एक्सपर्टीज आहे. हा चोर बाजार गाड्यांना बदलण्याचा स्वस्त माध्यम आहे. या मार्केटमध्ये बर्याच वेळा पोलिसांची रेड पडली आहे पण हे कधीही बंद झाले नाही.
केव्हा उघडत हे मार्केट
हे मार्केट एग्मोर ट्रेन स्टेशनहून 1 किलोमीटर दूर आहे. हे मार्केट सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडे राहते.
येथे काय आहे फेमस
येथ आपल्या गाड्या किंवा बाइक चुकूनही पार्क करू नये. असे ही होऊ शकत की तुम्हाला तुमच्या गाड्यांचे पार्ट मार्केटच्या दुकानांमध्ये मिळू शकतात.