“कलास्पंदन कला महोत्सव – २०२३” भारतातील विविध कलादालने व नामांकित चित्रकारांचा समावेश

मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (21:03 IST)
Kalaspandan Art Festival  2023 इंडियन आर्ट प्रमोटर संस्थेतर्फे “कलास्पंदन कला महोत्सव – 2023” हा भव्य कला महोत्सव दि. 30 नोव्हेंबर ते ३ डिसेंबर, 2023 हया दरम्यान मुंबईच्या वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर मध्ये भरविण्यात आला आहे. हया भव्य कला मेळाव्याचे उद्घाटन गुरुवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कला आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सदर महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे १०० पेक्षा जास्त चित्रकार व शिल्पकार भाग घेणार असून त्यांच्या 1500 कलाकृतींचा तसेच विविध कलादालनांचा समावेश करण्यात आला आहे.
 
इंडियन आर्ट प्रमोटरने आयोजित केलेल्या हया कला महोत्सवात अनेक प्रथितयश तसेच समकालीन चित्रकार व शिल्पकार यांच्या तैलरंग, जलरंग, अक्रीलिक, चारकोल, मिक्स मीडियम, ब्रोंझ, धातुशिल्प वास्तववादी आणि निम्न वास्तववादी तसेच अमूर्त शैलीतील कलाकृतींचे सादरीकरण होणार आहे. विद्यमान कलाजगतातील चित्रकारांच्या व शिल्पकारांच्या विविधांगी व वैशिष्ट्यपूर्ण अशा १५०० च्यावर कलाकृती बघण्याची सुवर्णसंधी सर्व कलाप्रेमी व रसिकांना हया कला मेळाव्यात पहायला मिळणार आहे.
 
कलास्पंदन कला महोत्सवात रामजी शर्मा, परमेश पॉल, सयाजीराव नांगरे, तीर्थंकर बिस्वास, अजय चांडक, राबीन बार, उल्हास राईकर, राजश्री दरेकर, सोंजय मौर्य, सरबनी गांगुली, स्नेहा नवरे, डॉ. वेंडी जैस, सुभेन्दू घोष, पुलक दास, सूर्यभान मेरवी, शीबा मंघट, लक्ष्मी वेंकटेश, तन्वी जेनील, वैशाली काळे, मेघना नलावडे, पूनम खानविलकर, शिरीष जोगळेकर, अमित वाघ, स्वाती मिश्रा, सौम्या स्वामीनाथन, बिनल गडा, मानसी शाह, गीता सुंदर, मुनवर बक्ष, मेहर्नोश वेंकटेश, प्रकाश आंबेगावकर, रेखा प्रकाश, माया अवनिथ, डॉ. प्रणिता राव, किशोर रॉय, शिवानी ओझा, अंकिता भटनागर, सोनाली कोरडे, मृणालिनी गायकवाड, मंजिरी तगारे, माधुरी नागे, संतोष कर्दक, सोनाली जाधव, जैनील देसाई, नम्रता दनीवर, राजन सरकार, शांति महादेवन, सूर्यकुमारी कोळीशेट्टी, विनिशा रूपारेल, स्टासिया फर्नांडिस, निधी कंथारिया, नंदिनी चंद्रवंशी, मनिषा शेखावत, एम. एम, शीना, डॉ. वैशाली दास, अमित, अरवा राज, अजान, प्रवीणा, गंगादीप सिंग, रंजीत, रीना चौधरी, दीबा कुरेशी, जयदीप घोष, संदिपा सेन, अरुणभा घोष, सतीश, मधुलिका निगम, संदेश जाधव, क्रिशा शाह, प्रशांत पाटील, जानवी पांडे, ज्योती उपाध्याय, हंसा सेवानी, लक्ष्मणसा कबाडी, बसवराज आरगी, सत्येश विश्वकर्मा, मुकेश विश्वकर्मा, गंगादास मच्छा, विलास गजरे, अमिता चक्रवर्ती, स्वरूप वेंकटरामन, विलेश सागवेकर, नितिन ब्रिड, दिव्या कामत, तन्मय निकम, रूपा हरीदास, नंदिता बॅनर्जी, दीपक बागडा, तुषार चोक्का, पूर्वा तेनानी, डॉ. वीरी गुप्ता, प्रणिता बोरा, घनश्याम गुप्ता, रामनाथ भट्ट आणि बरेच जण त्यांच्या कलाकृती प्रदर्शित करणार आहेत. तसेच हनी कॉम्ब, पेटल्स इंडिया, मृदा ग्राम, विनीज, ट्रेंडी वस्त्र, पेहरावाह, क्राफ्टनक्स्ट, ओरिएंटल हॅन्डीक्राफ्ट, बालाजी हॅन्डीक्राफ्ट, हँड मेड इन आशिया इत्यादी ब्रँड या महोत्सवात त्यांची वैशिष्ठ्ये प्रदर्शित करतील. हा कला महोत्सव दि. 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर, 2023 हया कालावधीत रोज 11 ते 7 हया वेळेत रसिकांना विनामुल्य पाहायला मिळणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती