आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दर वर्षी 21 फेब्रुवारीला साजरा केला जातो. युनेस्को संस्थेने 17 नोव्हेंबर 1999 रोजी हा दिवस "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन "म्हणून जाहीर केला.
मातृभाषा म्हणजे काय?
मातृभाषा म्हणजे अशी भाषा जी मुलं सर्वप्रथम आपल्या घरात बोलतो, ही भाषा त्याला त्याची पहिली गुरु म्हणजे त्याची आई त्याला शिकवते. भाषा विचारांची देवाण-घेवाण करण्याचा एक माध्यम आहे. मग ती भाषा कुठलीही असो.
भारतात अनेक धर्म आणि जातीचे लोक राहतात. प्रत्येकाची भाषा वेग-वेगळी आहे. भारतात बहुभाषिक लोक राहतात. आपल्या भाषेत बोलली जाणारी भाषा त्या भाषेची मायबोली म्हटली जाते.
बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषेचे संरक्षण करण्यासाठी "आंतरराष्ट्रीय मातृभाषादिन" जाहीर केला आणि 21 फेब्रुवारी ला "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन " साजरा केला जातो. 21 फेब्रुवारी 1952 मध्ये बंगाली भाषा ओळखावी म्हणून बांगलादेशात हा उत्सव साजरा केला जातो.