International Day of Persons with Disabilities :आज 3 डिसेंबर असून हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून आजार करण्यात येतो. तसेच हा दिवस अपंगांचे अधिकार आणि कल्याणला चालना देण्यासाठी आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या मूल्यांबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने साजरा करण्यात येतो. आज जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो.
जागतिक अपंग दिनाची सुरवात-
या दिवसाचा इतिहास जुना असून या दिवसाची घोषणा संयुक्त राष्ट्र महासभाव्दारा 1992 मध्ये प्रत्येक वर्षी 3 डिसेंबरला साजरा केला जाईल अशी करण्यात आली. समाजाच्या सर्व क्षेत्रात अपंग व्यक्तींच्या हक्कांचा प्रचार करणे आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनात अपंग व्यक्तींची जागृती करणे हा त्याचा उद्देश होता.
तसेच देशात अपंग असलेल्या लोकांसाठी सरकारने अनेक धोरणे आखली आहे. त्यांना सरकारी नोकऱ्या, हॉस्पिटल, रेल्वे, बस सर्वत्र आरक्षण मिळते. सरकारने दिव्यांगांसाठी पेन्शन योजनाही सुरू केली आहे.