जगातील मौल्यवान खड्डा....

मंगळवार, 4 एप्रिल 2017 (11:28 IST)
एरव्ही खड्डयांकहे दुर्लक्ष केले जात असले तरी पूर्वसायबेरियातील एक खड्डा खूपच मौल्यवान आहे, तुम्ही म्हणाल, काय सांगता? तर, होय... हा खड्डा खरंच मौल्यवान आहे. 
 
या खड्ड्याची किंमत 1,133 अब्ज रुपये आहे. डायमंड सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिर खाणपटूट्यातील हा खड्डा असून, तो इतर खड्ड्याप्रमाणे अतिशय धोकादायक आहे. कारण आकाशी उडणारे हेलिकॉप्टर्स हा खड्डा खेचून गिळंकृत करतो. दरवर्षी यातून 2 लाख कॅरेट्स हिरे काढले जातात. 
 
23014 मध्येही यातील भूयारातून 6 दशलक्ष कॅरेट्सचे कच्चे हिरे काढण्यात आले होते. या परिसरातील अशाच खड्ड्यांतून (खदानी) जगाच्या तुलनेत 23 टक्के हिे काढले जातात.  
 
येथे आढळणार्‍या हिर्‍यांचा आकार गोल्फच्या चेंडूएवढा असतो. या खड्ड्याची मालकी अलरोसा या रशियन कंपनीकडे आहे. ही खदान 1,722 फूट आणि एकूण परीध साडेतीन किलोमीटर आहे. 

वेबदुनिया वर वाचा