आपल्या निवासस्थानी हनुमान चालीसाचे पठण ही चांगली गोष्ट नव्हती का? मात्र प्रत्युत्तर म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचा विरोध झाला, त्यांना अटक करण्यात आली. खर्या अर्थाने श्रद्धेने हनुमान चालीसाचे पठण घरासमोर होऊ देणे ही देखील भाग्याची गोष्ट होती. पण आश्चर्य म्हणजे पवित्र पाठ यात देखील राजकारण शिरलं आणि हनुमंत नाराज झाले असावे...
येथे 'राजकीय संधी' चा फायदा न करून घेण्याची चूक घडली. येथे शक्ती प्रदर्शन करण्याऐवजी हिंदूंचे कौतुक करण्याची उद्धव ठाकरेंनी मोठी संधी गमावली. नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण करून त्यांना त्यांच्या घरासमोर बसवण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी आनंदाने स्वीकारला असता तर राज्यातील हिंदू देखील आनंदीच झाले असते.
संकट कटे मिटे सब पीरा , जो सुमिरै हनुमत बलबीरा
म्हणजेच जो भक्त महावीर हनुमानाचे चिंतन करतो, त्याचे सर्व संकट आपोआपच दूर होतात आणि सर्व दुःखांचाही नाश होतो.