#Boys/Girls Locker Room (Part 2)

प्रगती गरे दाभोळकर

शनिवार, 16 मे 2020 (13:30 IST)
#Boys locker room या धक्क्यातून मी कशीबशी बाहेर पडायचा प्रयत्न करत होते, तरी विचार येतंच होते, मित्र-मैत्रिणी, समवयस्क सगळ्यांशी या विषयावर चर्चा झाली होती, माझा सारखेच ते ही टेन्शन मध्ये होते कारण त्यांचे मुलं पण माझ्या मुलाचाच वयाचे आहे , जरा सावरले नाही तर एक नवीन लेख डोळ्यापुढे आला नाव होतं
 
# Girls locker room. खरं सांगते झोपच उडाली माझी, ज्या प्रकाराने काही मुलांनी ग्रुप तयार केला होता तसाच एक ग्रुप मुलींचा पण होता आणि विशेष म्हणजे सगळ्या मुली 15-16 वर्षाच्या आहे आणि मुलांसारखेच त्यांनीही अश्लील आणि घाणेरडे संवाद केले होते!! मला तर शहारे आले वाचून, मुली पण या थराला जाऊन बोलू शकतात याचं फार दुःख झालं, चार मैत्रिणींचा तो सिनेमा आठवला त्यात चौघी मुली अशाच उन्मत्त, बंधन न मानणाऱ्या, आणि घाणेरडी भाषा वापरणाऱ्या दाखवल्या आहेत. आणि लक्षात आलं की मुलासारखंच सगळं करणं हे आजकालच्या मुली फार महत्त्वाचं समजतात, खरं पाहिलं तर वाईट विचार मुलगा/मुलगी कोणाचाही मनात येतात आणि तसंच काही या #Girls locker room मध्ये घडल्या मर्यादित राहणं हे दोघांनाही माहीत नाही, मोठ्यांना सन्मान देणं त्यांची मदत करणं, घरात लक्ष देणं हे सगळं त्यांचा वाटेला आलंच नाही, कारण त्यांचा फास्ट लाईफ मध्ये या सगळ्याला जागा नाही!!! पण या जाळ्यात ही मुलं कशीकाय अडकून राहिली आहेत??? हे जाणणं आता आवश्यक झालंय, आई म्हणून किंवा पालक म्हणून आपण कुठे चुकतोय का??? 
 
आई आणि वडील हे दोघे मुलांचे आधारस्तंभ असतात पण दोघांच नातं मुलांशी काही अंशी वेगळं असतं, आई ही त्यातल्या त्यात जास्त जवळची अगदी मैत्रिणी सारखी असते म्हणूनच तिला प्रथम गुरू ची उपाधी मिळालेली आहे, आई म्हणजे माया, जिव्हाळा प्रेम आणि शिस्त याचं संमिश्रण असते पण जसा-जसा काळ बदलतोय मग तिने नको का बदलायला??? 
 
आता ती पूर्वीच्या बायकांप्रमाणे फक्त घरात राहत नाही, नोकरी किंवा व्यवसाय करते पण आजही तिची प्राथमिकता तिचं घरच आहे, आज एका आईवर कितीतरी पटीने ओझं वाढलंय कारण तिला आपली नोकरी करत घराकडे लक्ष तर द्यायचं आहे त्याशिवाय आपल्या मुलांची "सुपर मॉम" पण बनायचं आहे!!! या धावत्या युगात तिचं मूल कोणत्या स्पर्धेत मागे नको राहिला ही काळजी घ्यायची आहे!!!
 
न थांबता न घाबरता तिला मुलांचं बालपण मग शालेय जीवन आणि पुढचा अभ्यास हे सगळं व्यवस्थित सांभाळायचं आहे! आणि इतकं सगळं करत असताना जेव्हां मुलं अश्या प्रकार चे घाणेरडे संवाद करतात तर तिला कसं वाटत असेल??? 
 
कारण आजही समाजातला एक मोठा वर्ग मुलांचा अपराधाबद्दल आईलाच दोष देत असतो. पण मुलांचं संगोपन ही फक्त आईची जबाबदारी नसते आजची पिढी असं अमर्यादित का वागतेय हे शोधून काढण्याची जबाबदारी सगळ्यांवर आहे!!! आज आई-वडील दोघेही काळाप्रमाणे बदलायचा प्रयत्न करून राहिले आहे, पण मग असं काय आहे जे कमी पडतंय???? काय करणं गरजेचं आहे???
 
Boys locker room सारख्या घटना कोणत्या कारणांमुळे घटित होऊन राहिल्या आहे?? चला जाणण्याचा प्रयत्न करूया.....
 
1) स्वतंत्रता आणि स्वछंदता - माझ्या मते कोणत्याही गोष्टीची "अती" ही माती करणारी असते, मुलांना स्वतंत्रता देणं फार आवश्यक आहे पण कुठेतरी त्याचा गैरवापर तर होत नाहीये हे बघणं आवश्यक आहे, अती बांधून ठेवणं जसं चुकीचं आहे तसंच अती मोकळीक देणं पण गैर आहे,
दोन्ही गोष्टी बरोबर बॅलेस केल्या तर मात्र त्रास कमी होईल!!!
 
2) संवाद आणि वागणूक- या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाचा आहे , आपला मुलगा/मुलगी कसे वावरतात,इतरांशी बोलताना त्यांची वागणूक कशी असते?? स्वभावात दया, आदर , क्षमा हे गुण किती टक्के दिसताहेत, ह्या सगळ्या लहान-सहान गोष्टी जरी वाटल्या तरी महत्त्वाचा असतात, तसंच घरात असताना त्यांचे संवाद, व्यवहार कसा आहे?? डिप्रेशन किंवा टेन्शन मध्ये असताना आपण मोकळेपणाने बोलून त्यांना समज द्यायचा प्रयत्न केला पाहिजे!! असे काही विषय जे वाढत्या वयात बोलायची गरज आहे ते स्पष्टपणे सांगितले पाहिजे, ज्या कोणत्या विषयाला जाणून घ्यायची इच्छा असेल ते योग्य भाषेत प्रेमाने बोलले पाहिजे!!
या जगातील सगळी मुलं आई-वडिलांच्या छत्रछायेत स्वतःला सुरक्षित समजतात, मग आपण ही त्यांना अशीच जाणीव करून द्यायची, एक जादू ची झप्पी मारायची आणि मस्त गप्पा करायचा......
 
3) दोषी कोण मुलं की मुली - माझा मते दोष हा दोघांचाही आहे तुम्ही फक्त मुली आहात म्हणून यातून तुम्ही सेफ राहाल असं काही नाहीये, या घटनेत जितके मुलं दोषी आहेत तितक्याच मुली पण दोषी आहे, खरं पाहिलं तर ही घटना मुलगा/मुलगी नसून वाईट विचारांमुळे घडलेली आहे!!! दोघांनी एकमेकांविषयी आदर ठेवला नाही,आधुनिकीकरण हे या पिढीच्या डोक्यात शिरलेलं आहे, अनुकरण करण्याची पद्धत वाढत चाललीये, पण मला असं वाटतं की मुलं अथवा मुली या दोघांमध्ये  विशेष गुण असतात, आणि ते भिन्न असतात म्हणूनच सगळं व्यवस्थित असतं!!
 
आपल्या मुलींना हे शिकवायची फार गरज आहे की तुम्ही स्पर्धा नका निर्माण करू, तुमचं वेगळेपणच तुमचं वैशिष्ट्य आहे, तसंच मुलांना पण स्त्री विषयी आदर आणि प्रेम आलं पाहिजे, कोणालाही कोणाची बरोबरी करायची गरजच नाहीये!!! जर लहानपणापासून असे संस्कार होतील तर निश्चितच अश्या घटना घडणं थांबू शकतं. 
 
4) सोशल मीडिया आणि इंटरनेट चा वापर - हा मुद्दा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, आपले मुलं किती वेळ सोशल मीडिया आणि इंटरनेट वापरतात?? या विषयावर जागरूक राहणं फार आवश्यक आहे, त्यांचा हालचालींवर लक्ष देणं, ते काय बघतात कसा वेळ घालवतात हे फार बारकाईने पाहिले पाहिजे, कारण आज तुम्ही साधा टीव्ही जरी लावला तरी 1 तासाच्या सीरियल मध्ये अनेकदा अश्या अश्लील जाहिराती येतात की आपल्यालाच लाज वाटू लागते, सिनेमा पाहायला जा तरी तेच, स्तरहीन संवाद , कॉमेडी चा नावावर असभ्यता असं सगळं 24 तास घरातच उपलब्ध आहेत, ते तर जाऊ द्या जर मोबाईल मध्ये "कँडी क्रश" किंवा एखादा गेम खेळायला जा तर आधी बायकांचे अश्लील फोटो दिसतात, Vice city, San Andreas हे अशे काही गेम आहे ज्याचात अश्लीलता तर आहेच पण मारकाट आणि रक्त हेच दिसतं, समोरच्याला जीवे मारणं हीच त्या गेमला जिंकायची पायरी आहे!!!
 
कालचंच उदाहरण सांगते माझ्या 12 वर्षाचा मुलाने मला प्रश्न केला "आई यौन शब्द कुठे वापरतात" मला वाटलं तो yawn विचारतोय पण तो म्हणे हिंदी मधलं "यौन" मी जरा वेळ थांबली मग त्याला विचारलं की तू कुठे वाचलं तर तो म्हणे की गेम खेळताना एड आली होती "असुरक्षित यौन संबंध"!!!!! 
 
तो लहान नाही म्हणून मी त्याला व्यवस्थित सांगू शकले पण  5 आणि 6 वर्षाचे चिमुकले जे अक्षर वाचन शिकून राहिले आहे त्याचं काय???? आज या मुलांचा हातात सतत मोबाईल असतो , पण याचे परिणाम किती घातक असू शकतात याची जाणीव असली पाहिजे, दिल्लीला घडलेली घटना अशातलाच प्रकार आहे!! या सगळ्या वर नियंत्रण करणं आता फार गरजेचं आहे ,वेळीच पाऊल उचलले पाहिजे, जवाबदार लोकांनी इंटरनेट आणि मीडिया साठी शासनात नियम आणले पाहिजे! पालकांनी पण या घटनेचा दोष मुलांवर न टाकता स्वतः जागरूक राहून या विषयाला हाताळलं पाहिजे!!!!
 
एक आई या नात्याने मी विनंती करते की या जाळ्यात आपल्या पाखरांना अडकू देऊ नका, मुलांना प्रेम, माणुसकी , आदर , चांगली वागणूक शिकवा, जास्तीत जास्त संवाद साधून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करा जेणेकरून त्यांना बाहेर कुणाच्या मदतीची गरज पडू नये, लहानपणापासूनच त्यांना सांगा की मुलगा आणि मुलगी आपसात प्रतिद्वंदी नसतात, कुणीही अश्लील भाषा आणि संवाद करेल तर कायद्याने त्यांना शिक्षा होऊ शकते!!
 
बलात्कार ही घटना नाही अपराध आहे आणि असल्या विषयांवर चर्चा करणं पण गुन्हा आहे, तुम्ही मुलं असा किंवा मुली अशे संवाद तुमच्या जीवनासाठी घातक आहे!!!!! 
 
Boys/Girls Locker Room या ग्रुप मध्ये घडलेली घटना ही लज्जास्पद आणि आक्षेपार्ह आहे!!!! अश्या घटना पुन्हा होऊ नये हा प्रयत्न आपण सगळ्यांनीच केला पाहिजे.

Part 1 वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती