स्मृतिदिन विशेष : नाना शंकरशेठ

शुक्रवार, 31 जुलै 2015 (11:47 IST)
आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार आणि धनाढय़ व्यापारी जगन्नाथ शंकर ऊर्फ नाना शंकरशेठ यांचा आज स्मृतिदिन. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या गावी 10 फेब्रुवारी 1803 मध्ये त्यांचा जन्म झाला. मुंबई आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा व अनेकविध अशा लोककल्याणकारी सुधारणांचा पाया घालणारे कर्तृत्व हे याच नाना शंकरशेठांचे! ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज आणि एलफिस्टन कॉलेज व हायस्कूल, मुंबई विद्यापीठ ही त्यांनी अन्य कर्तृत्वस्थळे. भारतीयांच्या कायदे शिक्षणासाठी त्यांनी इंग्रजांना खास वर्ग सुरू करायला लावले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टची निर्मिती केली. तत्कालीन राजकीय चळवळीचे केंद्र झालेली ‘बॉम्बे असोसिएशन’ नानांनीच स्थापन केली. मुंबई महापालिकेचा श्री गणेशा करणार्‍या या नानांनी विहार, तलाव आणि राणीचा बाग, नाटकाची थिएटरे, पहिला सार्वजनिक दवाखाना निर्माण करण्यात पुढाकार घेतला. 31 जुलै 1865 रोजी नाना शंकरशेठ यांची जीवनज्योत मालविली.

वेबदुनिया वर वाचा