भारतामध्ये अनेक विचित्र गोष्टी घडत असतात. येथील लोकं अश्या विचित्र गोष्टींवर विश्वासही ठेवतात ज्या इतर देशातील लोकांसाठी आश्चर्यकारक किंवा मजेदार असतात. विचित्र गोष्टींवर विश्वास करण्यामागे कारणही डोळ्याने बघितलेलं, अनुभवलेलं असतं त्यामुळे शंका येतच नाही.
येथील लहान मुलेदेखील साप बघितल्यावर त्याला पकडण्यासाठी धावतात. कोणीही सापाला घाबरत नाही. बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्याच्या मुख्यालयाहून 23 किमी दूर हे गाव आहे ज्याचे नाव आहे सिंधिया घाट. या गावाचा सापांशी घनिष्ठ संबंध आहे. गावात राहणारे लोकं दिवसभर सापांशी खेळतात आणि खेळता- खेळता अनेकदा सापांनी मुलांना दंश मारले आहे परंतू मुलांवर त्यांचा काही प्रभाव होत नाही. येथील रहिवाशांप्रमाणे गावातील कोणत्याही व्यक्तीची सर्प दंशामुळे मृत्यू झालेली नाही कारण गावावर देवी भगवतीचा आशीर्वाद आहे.