एका विशिष्ट पिंजर्यात बसून एक किंवा दोन व्यक्तींना ही हिंस्त्र मगर पाहता येते. हा थरार अनुभवण्यासाठी जवळपास प्रत्येकी 8 हजार रुपये मोजावे लागतात. हिंस्त्र मगरीच्या टँकमध्ये जाण्याआधी प्रत्येकाला आधी काही मिनिटांची ट्रेनिंग दिली जाते. मगरीच्या टँकमध्ये गेल्यास काय करावे आणि कशी काळजी घ्यावी हे सगळे समजावून सांगितले जाते. मृत्यूच्या दाढेत जाण्याआधी हे ट्रेनिंग महत्त्वाचे आहे. त्यानंतर एका विशिष्ट आणि सुरक्षित अशा पिंजर्यात बंद करून एक किंवा दोन व्यक्तींना मगरीच्या टँकमध्ये सोडले जाते. या पंधरा मिनिटांत 16 फूट लांब असलेल्या मगरीला पाहण्याचा थरार लोकांना अनुभवता येतो; पण तो अनुभव घेत असताना प्रत्येकाला काही नियम पाळावे लागतात. जर नियम तोडले तर मात्र हा थरार अंगाशी येऊ शकतो. अतिशय भावह आणि चित्तथरारक असे हे दृष्य पाहण्यास व अनुभवण्यासाठी लोक आपल्या जिवाची पर्वा न करता तेथे जातात.