महिलांना समजून घेणे कठीण का?

स्त्रियांच्या मनात काय चालले आहे, याचा थांग लागणे फार कठीण असते. लग्नाला पन्नास वर्षे उलटली तरी पतीला आपल्या पत्नीच्या मनात काय चालले आहे, ते सांगता येणार नाही. असे म्हटले जाते ‍की स्त्रियांचे मन कळणे कोणालाच शक्य नाही. कारण त्या कोणत्या गोष्टीवर काय प्रतिक्रिया देतील हे सांगणे फार कठीण असते. शास्त्रज्ञही बर्‍याच वर्षांपासून त्यांच्या मनाचा वेध घेत होते. अखेर त्यांना याचे उत्तर मिळाले आहे.

शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार स्त्रियांच्या अनाकलनीय वागण्याला त्यांच्यातील जनुक रचना (जीन्स) रचना जबाबदार असते. समाजात, कुटुंबात, ऑफीसात नेहमी महिलांमध्ये स्पर्धा पहायला मिळते. पण पुरूषांमध्ये मात्र, अशी कोणतीही स्पर्धा सहसा दिसत नाही.

थोडक्यात पुरूषांमध्ये परस्परांबद्दल मत्सराची भावना सहसा नसते. पण स्त्रिया मात्र छोट्या मोठ्या गोष्टींवरही आपल्या महिला मैत्रिणीशी, सहकाऱ्याशी भांडणे करतात. शास्त्रज्ञांच्या मते, पुरूषांची जनुक संरचना सोपी असते, तर स्त्रियांची तितकीच गुंतागुंतीची.

फ्लोरिडा विद्यापीठात यासंदर्भात झालेल्या अध्ययनात सहभागी झालेल्या शास्त्रज्ञांनी सांग‍ितले, की स्त्रियांच्या तुलनेत पुरूष फक्त समजदारच नसतात, तर इतरांशी त्यांचे पटकन जमते. त्यांच्यात चांगला ताळमेळही निर्माण होतो.

शास्त्रज्ञांच्या मते स्त्री व पुरूषांमध्ये होणार्‍या आजारांवर वेगवेगळ्या पध्दतीने उपचार करण्याची गरजही यामुळे पुढे आली आहे. स्त्रियांमध्ये असणारी दोन एक्स गुणसुत्रे आणि पुरूषांमध्ये असणारी एक एक्स व एक वाय गुणसुत्रे यांचाही शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. त्यानुसार स्त्रियांमध्ये एक जास्त असलेले गुणसुत्र त्यांना जास्त गुंतागुंतीचे बनवितो. पुरूषांकडील एक गुणसुत्र त्यांच्या स्वभावाची रचना सरळ सोपी करतो, असा निष्कर्षही शास्त्रज्ञांनी काढला आहे.

वेबदुनिया वर वाचा