फुलपाखरांच्या जनुकीय संपादनातून त्यांच्या पंखावरील उमटणार्या हुबेहूब डोळ्यांच्या आकाराच्या ठिपक्यांच्या नक्षीचे गुपित उलगडले आहे. कॉर्नेल विद्यापीठाच्या संशोधकांनी हे रहस्य शोधून काढले आहे. फुलपाखरांच्या किंचितशा जनुकीय बदलाने त्यांच्यावरील या ठिपक्यांमध्ये कसा बदल घडतो ते त्यांनी दाखवून दिले. या संशोधनाचा फायदा फुलपाखरांची उत्क्रांती कशी झाली याचे गूढ उकलण्याकरता होणार आहे. फुलपाखरांच्या पंखावर नेमक्या कशाप्रकारे विविध प्रकारची नक्षी निर्माण होते. त्यामध्ये कसे बदल घडतात. ते नेमके कशामुळे घडतात या गोष्टींचा शोध घेण्यासाठी नवीन संशोधनाचा उपयोग होणार आहे.