फक्त साडे तीन तास झोपतात मोदी

दुनियेत असे अनेक लोकं असतील ज्यांना औषधं घेतल्याविना झोप येत नसेल, किंवा झोपेसाठी इतर काही उपाय करावे लागत असतील परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी असे नाही. त्यांना बिछान्यावर पडल्याबरोबर मात्र 30 सेकंदात झोप लागते. ते मात्र साडे तीन तास झोपतात. सकाळी 5 वाजेपासून त्यांची दिनचर्या सुरू होऊन जाते. जेव्हापासून त्यांनी पंतप्रधानाचे पद सांभाळले आहे तेव्हापासून त्यांनी एकही सुट्टी घेतलेली नाही, ही गोष्ट दिल्लीत एक माहितीचा अधिकार प्रदान करणारा कायदा (आरटीआय) अंतर्गत दिलेल्या सूचनेत समोर आली आहे.
 
आरटीआय अंतर्गत विचारण्यात आले होते की माजी पंतप्रधानांनी किती सुट्ट्या घेतल्या होत्या? यावर पीएमओ ऑफिसने उत्तर दिले की माजी पंतप्रधानांच्या सुट्ट्यांचा हिशोब तर नाही आहे परंतू वर्तमान पंतप्रधान मोदी यांच्या सुट्ट्यांचा हिशोब आहे. मोदींनी आपल्या कार्यकाळात आतापर्यंत एकदाही आधिकारिक रूपाने अवकाश घेतलेला नाही. त्यांनी अगदी दिवाळी आणि दसर्‍याही सुट्टी घेतलेली नाही. न्यूज चॅनलप्रमाणे मोदींनी मागली दिवाळी बॉर्डरवर पोस्टिंग असलेले सैनिकांसोबत साजरी केली होती तर, यावेळी दसरा लखनौ येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात साजरा केला.
 
वाचा मोदींबद्दल आश्चर्यात टाकणारे तथ्य-
मोदींना 30 सेकंदात येते झोप: मोदी यांनी एकदा सांगितले होते की जेव्हा मी आपले सर्व कामं आटपून रात्री बिछान्यावर जातो तर मात्र 30 सेकंदात झोप लागते ती पण गाढ. माझे डॉक्टर्सही मला सल्ला देतात की मी कमी झोप घेतो आणि मला कमीत कमी पाच तास झोप घ्यायला हवी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जेव्हा दिल्ली आले होते, तेव्हा त्यांनीही म्हटले होते की आपण खूप कमी झोप घेतात.

पुढे वाचा मोदींची दिनचर्या...

सकाळी 5 वाजेपासून सुरू होते मोदींची दिनचर्या: पंतप्रधान मोदींनी म्हटले की माझी दिनचर्या सकाळी पाच वाजेपासून सुरू होते. नियत वेळेवर झोप उघडते. मी फिरायला जातो. नंतर योग आणि प्राणायाम करतो. हे सर्व मला आत्मबळ देतं. योगामुळे मला थकवा, झोप आणि भूक इत्यादींमध्ये मदत मिळते. योगानंतर मी स्वत: सोशल मीडियाचे पुनरवलोकन करतो, मेल चेक करतो आणि ज्यांना उत्तर देयचे असतं त्यांना स्वत: उत्तर देतो. सकाळी 7 वाजता मी पीएमओ ऑफिसला दिशानिर्देश देतो.
 
अधिक कामाने मोदींना मिळते ऊर्जा: जगदीश ठक्कर मोदींच्या जवळ असतात. ठक्कर यांनी सांगितले की मोदी नेहमी कामाला महत्त्व देतात. काम कमी असल्यास त्रास होतो आणि अधिक काम असल्यास त्यांना ऊर्जा मिळते. हेच कारण आहे की पंतप्रधान सकाळी 9 वाजेच्या पाच मिनिटाआधीच पीएमओ ऑफिसमध्ये पोहचून जातात. मोदी स्वत:च एवढे सक्रिय राहतात म्हणूनच त्यांचा स्टॉफही सक्रिय असतो.
मोदींना पाणी देतं ताकद: नरेंद्र मोदींसाठी पाणी जीवन आहे. दहशतवाद्यांविरुद्ध जेव्हा भारतीय सेनाने 'सर्जिकल स्ट्राइक' केली तर मोदी रात्रभर झोपले नाही. जोपर्यंत ऑपरेशन सुरू होतं तोपर्यंत ते पाणीदेखील प्यायले नाही. ऑपरेशन संपल्यानंतर त्यांनी पाणी ग्रहण केले.
 
नवरात्री ते केवळ पाणी पितात: मोदी दर नवरात्रीत पूर्ण नऊ दिवस उपास करतात आणि केवळ पाणी पितात. नवरात्री दरम्यान जेव्हा मोदी अमेरिका यात्रेवर होते तेव्हा ओबामा यांनी मोदींना डिनरसाठी निमंत्रण पाठवले होते पण तेव्हा मोदींनी म्हटले की मी उपासावर आहे म्हणून आपले निमंत्रण स्वीकार करू शकतं नाही.

वेबदुनिया वर वाचा