वर्धमानमधील कटवा या गावात राहणार्या या महिलेचे पातुरानी घोष असे नाव आहे. ती आपल्या मुलीकडे राहण्यास आहे. पातुरानी यांच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, ही महिला महिन्यात दोन वेळा फक्त भात खात असते. इतर वेळी ही महिला इच्छा झाली तरच जेवण करते. कमी जेवणामुळे ती शौचास खूप कमी वेळा जाते.
पातुरानी यांना याविषयी विचारले असता, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे तिला भीती वाटते. त्यामुळे ती पाण्यात राहते. विशेष म्हणजे दररोज पाण्यात राहूनही या महिलेला सर्दी, खोकला असा कोणताही आजार होत नाही. डॉक्टर तापस सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार पातुरानी ही एक मानसिक रूग्ण आहे. तिच्यावर उपचार केले जातील.