असे लोकं असतात जास्त लठ्ठ

साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या किंवा कमी उत्पन्न असलेल्या लोकांमध्ये राहणार्‍या किशोर वयीन मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असते. एका नव्या संशोधनानुसार अशा परिसरातील 25% तरुणांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. 
 
कॅन्सर परमनेंट साउदर्न कॅलिफोर्नियाच्या संशोधन विभागाचे देबोराह रोहम यंग यांनी ही माहिती दिली. त्यांच्या मते, तारुण्यात पदार्पण करणार्‍या व्यक्तींमध्ये वजन वाढण्याची अनेक कारणे आहेत. यातील प्रमुख कारण त्यांचे बाहेरील खाणे आहे. या संशोधनासाठी शोधकत्र्यांनी 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या विविध वर्गातील सुमारे 22 हजार 823 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर त्यांचे जवळपास चार वर्षे परीक्षण करण्यात आले.
 
चार वर्षाच्या अध्ययनानंतर ज्या व्यक्ती साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या भागात राहात होत, त्या भागातील जवळपास 23% व्यक्तींमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले. तर कमी उत्पन्न असलेल्या परिसरातील 2% व्यक्तींचे वजन वाढल्याचे दिसून आले. याशिवाय महिला किंवा कृष्णवर्णीय पुरुष आणि गोर्‍या व्यक्तींच्या तुलनेत 1.7 आणि 1.3 टक्के व्यक्तींमध्ये लठ्ठपणाचा अधिक धोका होता.

यंग ने पेड्रियाट्रिक ओबेसिटी नावाच्या पत्रिकेत हा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला असून यामध्ये, ज्या भागात मूलभूत सुविधा मिळत नाहीत, त्या भागात लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असल्याचा धोका जास्त असतो. असे नमूद करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा