विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार राहणार आहे आणि विराट कोहली उपकर्णधार असेल. निवडपूर्वी शक्यता वर्तवण्यात येत होती की युवराज सिंगला संघात जागा मिळेल पण असे काहीही झाले नाही. रविंद्र जडेजाचा संघात समावेश.
भारतीय संघ - महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली, सुरेश रैना, अंबाटी रायडू, मोहम्मद शमी, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी, उमेश यादव, इशांत शर्मा व रविंद्र जडेजा.
वर्ल्ड कप 2015 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलँडमध्ये संयुक्तपणे आयोजित करण्यात येत आहे.